गुटखा थुंकण्यासाठी मान वाकवली अन् बाईकस्वाराला जीव गमवावा लागला

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून एक प्रकरण समोर आले आहे.बाईकस्वाराने गुटखा खाकून थुंकायला मान वाकवली आणि मागून आलेल्या गाडीने धक्का दिला. यामध्ये त्या बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास कोतवाली देहात येथील अभ्याकला येथील चार लेन डायव्हर्जनजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा हा तरुण सुलतानपूरहून लंभुआला जात होता. हा दुचाकीस्वाराच्या तोंडात गुटखा होता. तो थुंकण्यासाठी उजवीकडे वळताच मागून येणाऱ्या एका वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तो तरुण त्याच्या दुचाकीसह गाडीखाली आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

हैदर अन्सारी असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे सापडलेल्या आधार कार्डवरून त्या तरुणाची माहिती मिळवली. ग्रामीण एसएचओ सत्येंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.