Jalna News – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पाच जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर जालना एक्झिट पॉईंट पारसी टेकडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघात आज (8 फेब्रुवारी 2025) दुपारी 2.35 च्या सुमारास घडला आहे. जालना एक्झिट पॉईंट पारसी टेकडीजवळ टोयोटा कंपनीचा एक गाडी पाच प्रवशांना घेऊन समृद्धी महामार्गावरून जालनाच्या दिशेने जात होती. याच दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला गाडीने जोरादर धडक दिली. या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गीडीतील पाच जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे यांच्यासह पोलीस अंमलदार मस्के, ज्ञानेश्वर खराडे व एम एस एफचे दोन जवान तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले.

सदर अपघातामध्ये वाहनाचे जास्तीचे नुकसान झाले असून, दुर्वांकुर विशाल नाईक, मनीषा विशाल नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वाहन चालक समीर अब्दुल शेख, संस्कृती विशाल नाईक,अनुष्का कुमावत हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून जालना येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.