![junkl-food](https://www.saamana.com/wp-content/uploads/2017/05/Junkl-food-696x447.jpg)
आपल्यासाठी सध्याच्या घडीला पिज्जा, बर्गर तत्सम जंकफूड हाच परिपूर्ण आहार झालेला आहे. या आहारामुळे आपल्या शरीराला फायद्याऐवजी तोटाच होतो. असे खाद्यपदार्थ आणि पेये आरोग्याला हानी पोहोचवण्यासोबतच अनेक आजारांचे कारण बनतात. म्हणून, काही खाद्यपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.
आजकाल दर दहा लोकांपैकी किमान दोन ते तीन जणांना पोटाच्या समस्येने त्रस्त असताना आपल्याला दिसतात. गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत तर कुणी पोटदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त असाल, तर आत्ताच जंक फूड खाणे थांबवा. जंक फूड खाल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवरही खूप वाईट परीणाम होतात.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2017/05/junk-food.jpg)
जंक फूडमुळे आपल्या शरीरात अधिकांश प्रमाणात चरबी जमा होते. ही चरबी यकृतामध्ये जमा होण्यास सुरुवात होते त्यामुळेच फॅटी लिव्हर होते. तसेच जंक फूडमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे, यकृतातील ग्लुकोजचे फॅटमध्ये रुपांतर होते हेच फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे.
पॅकेटबंद अन्नपदार्थ तर आरोग्यासाठी अतिशय वाईट आहेत. यामुळे वजन तर वाढतेच. पण इतर अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज, मीठ, साखर आणि फॅट असते. जंक फूडमधील घटकांमुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता आणि मधुमेह आजाराचा समावेश होतो.
समोसा, कचोरी, नूडल्स, मंचुरियन यासारख्या पदार्थांचा समावेश जंक फूडमध्ये होतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या जीभेवर लगाम घाला आणि जंक फूड खाणे आजपासूनच टाळा.