Video – बैल गेला अन् झोपा केला! बीडमध्ये नामचिन गुंड, माफियांची परेड

वाल्मीक कराडच्या चाकरीत धन्यता मानणाऱ्या बीड पोलिसांना आता कायदा आणि सुव्यवस्थेचा उमाळा आला आहे. जिल्हाभरातील नामचिन गुंड तसेच माफियांना शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात येऊन त्यांची परेड काढण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी गुंडगिरी कमी न झाल्यास ‘मकोका’ लावण्याचा इशारा दिला.