![neehar (32)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-32-1-696x447.jpg)
बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट आपल्या किचनमधील एक महत्त्वाची पावडर. खासकरून केक,पेस्ट्रीज, मफीन, ब्रेड बनवण्यासाठी या पावडरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. कोणतेही पीठ फुगण्यासाठी हा सोडा प्रत्येक घरोघरी वापरला जातो. प्रत्येक घराच्या किचनमधील हा सोडा अनेक गोष्टींसाठी उपयुक्त मानला जातो. जाणून घेऊया आपण बेकिंग सोडा पदार्थांव्यतिरिक्त कुठे आणि कसा वापरू शकतो.
दातांसाठी बेकिंग सोडा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. बेकिंग सोडा दातावर घासल्यामुळे दात किडण्याची प्रक्रिया ही मंदावते. तसेच आपल्या हातांच्या नखांसाठीही बेकिंग सोडा हा खूप उपयुक्त मानला जातो.
छातीत जळजळ आणि अपचनावर बेकिंग सोडा हा रामबाण इलाज मानला जातो.
केसांना धुण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो.
शरीरावरील दुर्गंधीसाठी सुद्धा बेकिंग सोडा हा फार महत्त्वाचा मानला जातो.
आग विझवण्यासाठी सुद्धा बेकिंग सोडा हा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
फ्रिज, ओवन, डिशवाॅशर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करण्यात येतो.
चांदीची भांडी चमकवण्यासाठी बेकिंग सोडा हा सर्वोत्तम उपाय आहे.
करपलेली भांडी, टोप, कढई पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ करायची असल्यास, बेकिंग सोड्यामध्ये बुडवून ठेवल्यास भांडी पुन्हा स्वच्छ होतात.
फरशी चमकविण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर अनेक घरांमध्ये करतात.
बाथरुम स्वच्छ ठेवण्यासाठी बेकिंग सोडा हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या यांच्यावरील घाण निघून जावी म्हणून बेकिंग सोडा धुण्यासाठी वापरला जातो.