![neehar (24)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-24-1-696x447.jpg)
काळ बदलला आणि लग्नाच्या व्याख्या बदलल्या. एक काळ होता जिथे आई वडिल लग्नासाठी सून आणि जावई यांची निवड करायचे. तो काळ केव्हाच मागे पडला आणि प्रेम विवाहाची चलती सुरु झाली. मान्यता असलेले प्रेमविवाह समाजातील कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरले. पण याहीपलीकडे जाऊन आता अलीकडील मुलं मुली मात्र लग्नापेक्षा लिव्हिंग इनला जास्त पसंती देताना दिसत आहेत. भरमसाठ पैसा ओतून लग्न करुन नंतर घटस्फोटाला सामोरे जाण्यापेक्षा सर्वात आधी लिव्हिंग इन राहून बघुया असा ट्रेंड वाढू लागला आहे. मुख्य म्हणजे या नवीन विचारांच्या बदलांना आता आईवडिलांनाही हिरवा कंदील दाखवला आहे.
लिव्हिंग इन म्हणजे लग्नाआधी एकमेकांसोबत काही काळ एकत्र राहणे ही पद्धत आता तरुणांमध्ये चांगलीच रुजली आहे. असं म्हणतात की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आता आपण जाणुन घेऊया लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे काय होतात फायदे.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-25-1.jpg)
एकमेकांना समजून घेण्यासाठी
जोडीदार कसा आहे हे समजून घेण्यासाठी लिव्हिंग इन हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. आपण ज्याच्यासोबत किंवा जिच्यासोबत लग्न केल्यानंतर राहणार आहोत, ती व्यक्ती कशी आहे हे कळणं खूपच गरजेचं असतं. म्हणूनच लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यास नंतरचा प्रवास अधिक सुखकर होतो.
व्दिधा मनःस्थिती
आजही लग्न करावं की नाही करावं अशी व्दिधा मनःस्थिती असणारे अनेकजण आहेत. अशा कपल्ससाठी लिव्हिंग इन हा एक बेस्ट पर्याय आहे. किमान नातेसंबंधांची यामुळे जाण निर्माण होते. समोरच्या व्यक्तीसोबत आपण खरोखर जुळवून घेऊ शकतो का याची जाण होते.
एकमेकांची उत्तम ओळख
लिव्हिंग इन मध्ये एकमेकांना उत्तम पद्धतीने जाणून घेता येते. एकमेकांच्या सवयी काय आहेत हे कळते. शिवाय एखादी आवड निवड जुळते की नाही हे सुद्धा समजते. काही गोष्टी या आधी माहित असल्यानंतर, नंतरचा प्रवास हा खूप सोपा होतो.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-26-1.jpg)
जबाबदारीची जाणीव
एकत्र राहिल्यामुळे दोघांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव होते. एकदा का जबाबदारी कळली की, पुढच्या गोष्टी सोप्या होतात. एकत्र राहताना एकमेकांच्या सवयींसह अनेक गोष्टीची जाणीव आपल्याला होते.
भावनिक जवळीक
प्रत्येक नात्यामध्ये भावना ही खूपच महत्त्वाची मानली जाते. नात्यामध्ये भावना असणं हे एक उत्तम माणूस असण्याचं लक्षण आहे. एकमेकांसोबत काही काळ व्यतित केल्यानंतर, एकमेकांविषयी आदरयुक्त भावना निर्माण होते. कुठल्याही नात्यामध्ये आदरयुक्त भावना असणं हे चांगले लक्षण मानले जाते.