![chhava 1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/chhava-1-696x447.jpg)
>> दिलीप ठाकूर
सोशल मीडियात भरपूर पोस्ट केल्या की चित्रपटाची भरघोस प्रसिॆाr होतेच असे नाही. चित्रपटाच्या स्वरूपानुसार त्याची पूर्वप्रसिॆाr आणि मग प्रदर्शन (रिलीज या अर्थाने) यात चित्रपटगृहाच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ याचे समीकरण समाधानकारक पद्धतीनुसार जुळवून आणले तर?
चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीचे ‘बजेट’ भारीभक्कम असले, मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिनी, रेडिओ, डिजिटल माध्यम या सगळ्यांतून भरपूर मुलाखती दिल्या, सोशल मीडियात भरपूर पोस्ट केल्या की चित्रपटाची भरघोस प्रसिध्दी होतेच असे नाही. चित्रपटाच्या स्वरूपानुसार त्याची पूर्वप्रसिॆाr आणि मग प्रदर्शन (रिलीज या अर्थाने) यात चित्रपटगृहाच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ याचे समीकरण समाधानकारक पध्दतीनुसार जुळवून आणले तर?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ कधी पडद्यावर येतोय नि कधी पाहतोय असे अनेक चित्रपट रसिकांना झाल्याचे सोशल मीडियातील त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहताना स्पष्ट होतेय. त्यासाठी या ऐतिहासिक चित्रपटाची ‘फर्स्ट लूक’साठीची खेळी महत्त्वाची ठरलीय हे आपल्याही लक्षात आले असेल. आज जवळपास प्रत्येक मराठी व हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एखाद्या मल्टीप्लेक्समध्ये होतो या प्रथेला बाजूला ठेवून शिवाजी पार्क, दादर परिसरातील महाराष्ट्रीय वस्तीतील प्लाझा चित्रपटगृहाची निवड केली. येथेच चित्रपटाने पूर्वप्रसिध्दीची अर्धी लढाई जिंकली. प्लाझाच्या प्रवेशद्वारापासून लेझीमचा धमाका. स्टेजवर काही प्रतिकृती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशी विकी कौशलकडून गर्जना. प्लाझाची निवड ही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याची कल्पना असेल तर त्याला मनापासून दाद.
मला आठवतेय, रमेश देव निर्मित व राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटासाठी प्लाझावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिमाखदार प्रतिमा आणि बाजूला भव्य तोफेचा कटआऊट असा देखणा देखावा उभारलेला. तो पाहताक्षणीच ‘सर्जा’चे तिकीट काढावेसे वाटणारच. चित्रपटाची प्रसिद्धी असावी तर अशी. कमाल अमरोही दिग्दर्शित
‘रझिया सुल्तान’ भलेही फर्स्ट शोपासूनच फ्लॉप ठरला असेल, पण मराठा मंदिर चित्रपटगृहावर त्याचे भव्य डेकोरेशन पाहण्यासाठी गर्दी होई.
कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पूर्वी मुंबईतील मिनर्व्हा चित्रपटगृहावर मध्यभागी कटआऊट पाहायला मिळे. ‘दाग’च्या शर्मिला टागोर व राखी यांच्या खांद्यावर हात टाकलेला राजेश खन्ना, ‘दीवार’चा शर्टाला गाठ मारून नजरेत खुन्नस असलेला विजय, ‘शोले’तील गब्बरसिंगची ठाकूर बलदेवसिंगला घातलेली पकड असे अनेक कटआऊट तेथे पाहायला मिळाले. त्याची उंची अवाजवी नसल्याने ते एकूणच डेकोरेशनचा एक भाग ठरले. कालांतराने रजनीकांतचे चित्रपट माटुंगा येथील अरोरा चित्रपटगृहात, मग वडाळा येथील मल्टीप्लेक्समध्ये झळकताना कटआऊट केवढे तरी मोठे ठरू लागले. पहाटे वाजत गाजत ‘रजनीकांतपट’ पाहायला येणे, कटआऊटला दुधाने आंघोळ घालणे हे सगळेच भारी ठरले.
ती परंपरा अॅनिमल (रणबीर कपूर), पुष्पा 2 (अल्लू अर्जुन) अशी यशस्वीपणे पुढे चाललीय. दक्षिणेकडील एका प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीसह दक्षिणेकडील अन्य भाषेत डब करून आता दणक्यात प्रदर्शित होताना त्याचा कटआऊट प्रचंड मोठाच असणार हे हुकूमी समीकरण झालेय. चित्रपट प्रर्दशन म्हणजे गवगवा हवाच, एक प्रकारचे सेलिब्रेशन असावे असे हे नाते आहे. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यात अशा गोष्टी जास्त यशस्वी ठरताना दिसताहेत.
– [email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)