![neehar (29)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-29-696x447.jpg)
आपल्याला बगीचा करण्याची आवड असेल तर, आपण बगीचाभर आपण अनेक झाडे लावतो. परंतु बगीचा करण्यासाठी जागा नसल्यास, आपल्याला घरात झाडे लावण्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो. घरातील शुद्ध आणि खेळती हवा राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर, घरामध्येही आपण काही महत्त्वाची झाडे लावू शकतो. हवा शुद्ध ठेवण्यासाठी काही झाडे ही खूप उत्तम मानली जातात.सध्याच्या घडीला आपण ग्लोबल वाॅर्मिंगच्या महाभयानक समस्यांना सामोरे जात आहोत. अशा वातावरणात स्वच्छ, शुद्ध हवा मिळणे हे खूपच गरजेचे आहे. या अशा वातावरणात काही झाडे आपण घरात लावल्यासही आपल्या आरोग्यावर या झाडांचा उत्तम परीणाम होऊ शकतो.
पीस लिली
पीस लिली या झाडाला फार देखरेख करावी लागत नाही. त्यामुळे या झाडाला तुम्हाला रोज पाणी घालण्याची गरज नाही. या झाडाला दिवसातून दोन तास सुर्यप्रकाश मिळाला तरी चालण्यासारखे आहे. घरातील ओलावा हे झाड शोषून घेते. तसेच शुद्ध हवा या झाडामार्फत आपल्याला मिळते.
जेड प्लांट
सध्याच्या घडीला हे झाड घरामध्ये आणण्याची खूप चलती आहे. या झाडामध्ये पर्यावरणाच्या तसेच औषधाच्या दृष्टीने उत्तम गुणधर्म आहेत. घराच्या सजावटीमध्येही या झाडाचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. तणाव कमी करण्यासाठी तसेच उत्तम झोप येण्यासाठी हे झाड घरात असणे खूपच गरजेचे झालेले आहे.
एरिका पाम
एरिका पाम हे झाड हवेतील विषारी पदार्थ शोषून घेण्यास मदत करते. घरामध्ये हे झाड लावल्यास डोळ्यांची खाज तसेच घशातील खरखर कमी होण्यास मदत होते.
मनी प्लांट
या झाडाच्या नावातच खूप काही आलं. हे झाड समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच घरात झाड लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. मनी प्लांट कार्बन मोनोआक्साइड सारख्या अपायकारक घटकांना हवेतून शोषून घेतो. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांट हे झाड हवेच्या शुद्धीसाठी एकदम अचूक पर्याय मानला जातो. एलर्जी पासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे झाड बहुमोली आहे.