Delhi Election Result – दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी विजयी, भाजपचे रमेश बिधुरी यांचा केला पराभव

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. आतिशी यांनी भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे.

आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठे धक्के बसले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचा पराभव झाला आहे.