Delhi Election Result – ‘आप’ला धक्का; माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघातून त्यांना 600 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे तरविंदरसिंग मारवाह यांनी येथून विजय मिळवला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ पहायला मिळत असून अनेक बडे नेते पराभवाच्या छायेत आहेत. मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे, तर माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली आणि मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

Delhi Election Result – अजित पवार गटावर मोठी नामुष्की, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

कालकाजी मतदारसंघात आठव्या फेरीनंतर आतिशी 1911 मतांनी पिछाडीवर आहेत. येथे अजून मतमोजणीच्या 4 फेऱ्या बाकी आहे. तर दुसरीकडे नवी दिल्ली मतदारसंघात 10 फेऱ्यानंतर केजरीवाल 1844 मतांनी पिछाडीवर आहेत. येथे अजून मतमोजणीच्या 3 फेऱ्या बाकी आहेत.

Delhi Election Result – दिल्लीत भाजपनं चालवला ‘झाडू’, आप विरोधी बाकांवर

दरम्यान, या पराभवानंतर मनिष सिसोदिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांगली लढाई लढली. आम्ही कसोशीने प्रयत्न केले, लोकांनीही पाठींबा दिला. पण थोडक्यात पराभव झाला. मी विजयी उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि मतदारसंघात तो चांगले काम करेल अशी आशा करतो, असे सिसोदिया म्हणाले.