Delhi Election Result – अजित पवार गटावर मोठी नामुष्की, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दिल्ली विधानसभा निवडणूकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे सर्वच्या सर्व 23 उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. या उमेदवारांना इतकी कमी मतं मिळाली आहेत की त्यांची अनामत रक्कम देखील निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकीत अजित पवारांकडून 23 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. दिल्लीत अजित पवार गटाला अवघे 0.03 टक्के मतं मिळाली आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार भाजप 46 जागांवर तर आप 26 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नसून दिल्लीच्या लोकांनी काँग्रेसला सपशेल नाकारल्याचे दिसून येत आहे.