Delhi Election Result – अजून लढा आपापसात, ओमर अब्दुल्ला आप काँग्रेसवर भडकले

omar-abdullah

दिल्ली विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे इंडिया आघाडीत एकत्र असूनही आप व काँग्रेसने दिल्लीत स्वतंत्र निवडणूका लढवल्या. त्याचा फटका दिल्ली विधानसभा निवडणूकीत लागल्याचे निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून येत आहे. सध्या आप 30 जागांवर आघाडीवर असून भाजप बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचली आहे.

दिल्लीच्या निकालाच्या सुरुवातीच्या कलांवरून भाजप सत्ता स्थापन करेल असे दिसत आहे. त्यावरून जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे काँग्रेस व आपवर भडकले आहेत. त्यांनी ट्विटरवर ”अजून लढा आपापसात” असे लिहून आप व काँग्रेसला फटकारले आहे.