पंडित नेहरूंचे कुंभमेळ्यासाठी मोठे योगदान

1940 मधील कुंभमेळ्यात इंग्रजांनी स्नान करण्यास बंदी घातली होती. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना याबाबत कळताच त्यांनी स्वतः धोतर खोचून त्रिवेणी संगमावर जाऊन डुबकी घेतली होती. त्यांच्यापाठोपाठ हजारो, लाखो हिंदूंनी डुबकी घेतली. त्यानंतर कुंभसाठी इंग्रजांनी कधीही विरोध केला नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. महाकुंभमेळा हे धार्मिक पर्व आहे. तिथे राजकारणाला थारा असू नये, असे खडे बोलही शंकराचार्यांनी सुनावले.