कृष्णा घाटीजवळ नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करून हिंदुस्थानी चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट हिंदुस्थानच्या सुरक्षा दलाने उधळून लावला. दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती आधीच हिंदुस्थान लष्कराला मिळाली आणि त्यांच्या हल्ल्यापूर्वीच हल्ला करून सुरक्षा दलाच्या जवानांनी 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. 4 फेब्रुवारीच्या रात्री हिंदुस्थानी चौकीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता.
नियंत्रण रेषेवरून हिंदुस्थानात घुसखोरीचा प्रयत्न करत असताना भूसुरुंगाचा स्फोट होऊन पाच दहशतवादी ठार झाल्याची घटना आज घडली. पाकव्याप्त कश्मीरमधून हे दहशतवादी सीमा ओलांडत होते. दरम्यान, पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिमेकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी राबवलेल्या मोहिमेत 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.