![sheikh-hasina](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/10/sheikh-hasina-696x447.jpg)
हिंदुस्थानने बांगलादेशला आज कडक शब्दांत फटकारले. परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशचे कार्यवाहक उच्चायुक्त मोहम्मद नुरुल इस्लाम यांना आज संध्याकाळी बोलावून घेतले. हिंदुस्थानला बांगलादेशसोबत सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर फायदेशीर संबंध हवेत. असे असतानाही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने केलेली हिंदुस्थानविरोधी विधाने खेदजनक आहेत.
माजी पंतप्रधान शेख हसिना यांनी केलेल्या टिप्पण्या वैयक्तिक होत्या, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, शेख हसिना सरकारच्या पतनानंतर प्रथमच बॉर्डर गार्ड्स बांगलादेश आणि हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सीमेवरील तणावावर यावेळी चर्चा होईल.