उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभ नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागली. येथील सेक्टर 18 मधील इस्कॉनच्या तंबूमध्ये आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. थोडय़ाच वेळात आजुबाजूच्या जवळपास डझनभर तंबूंत आग पसरून ते भस्मसात झाले.