![Mhada](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/12/Mhada-1-696x447.jpg)
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता नवव्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन होणार आहे. आतापर्यंत म्हाडामध्ये आठ लोकशाही दिन घेण्यात आले असून लोकशाही दिनात 81 प्राप्त अर्जांपैकी 75 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.