![railway](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/09/railway-696x447.jpg)
मध्य रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली तसेच कोचिंग रिफंड व अन्य काही सेवा शनिवारी रात्री 11.45 ते मध्यरात्री 3.15 या वेळेत बंद राहणार आहेत. डिस्क डी-प्रॅगमेंटेशनसाठी मुंबई पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम बंद ठेवली जाणार आहे. त्याचा आरक्षण व अन्य सेवांना फटका बसणार आहे. तथापि, विद्यमान परतावा नियमांनुसार परतावा देण्यासाठी टीडीआर जारी केला जाईल. मुंबई पीआरएस गाडय़ांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध राहणार नाही.