विमानतळावरून चार कोटींचे सोने जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून चार परदेशी महिलांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे चार कोटींचे सोने जप्त केले. परदेशातून काही महिला या सोने घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीची डीआरआयने सत्यता पडताळली. नुकतेच डीआरआयने विमानतळावर सापळा रचून चार केनियन महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी घातलेल्या बुरख्यामध्ये सोने लपवले होते.