![Painting Competition](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/09/Painting-Competition--696x447.jpg)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवांतर्गत पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेस मतदारसंघातील विधानसभानिहाय विविध कयोगटातील स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रकला सादर करणाऱ्या सुमारे 108 विजेत्यांना आज शनिवार, 8 फेब्रुकारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन, दादर येथे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या बक्षीस वितरण समारंभास शिवसेना नेते दिवाकर रावते, ऍड. लीलाधर डाके, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते मिलिंद वैद्य, सुबोध आचार्य, सचिव सूरज चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटिका श्रद्धा जाधव, पद्मावती शिंदे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.