अर्थवृत्त – शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्समध्ये 197 अंकांची घसरण, निफ्टीतही पडझड 

व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 197 अंकांच्या घसरणीसह 77,860 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 43 अंक म्हणजेच 0.18 टक्के घसरणीसोबत 23,561 अंकांवर बंद झाला.

रिझर्व्ह बँकेने एमपीसी बैठकीत धिम्या झालेल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर देण्यासाठी मे 2020 नंतर पहिल्यांदा आपल्या रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करून 6.25 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारात अच्छे दिन दिसतील असे वाटत होते, परंतु शेअर बाजारात याउलट चित्र दिसले. शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसले नाही. सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पाहायला मिळाली. पॉवर ग्रीड, आयटीसी, भारतीय स्टेट बँक, नेस्ले, एचसीएल टेक, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एशियन पेंटसच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली, तर दुसरीकडे टाटा स्टील, झोमॅटो, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

मेक माय ट्रिप

n मेक माय ट्रिपने यात्रेकरूंना परिपूर्ण निवास शोधण्यास मदत करण्यासाठी ‘लव्ड बाय डेवोटीज’ लॉन्च केले. या प्लॅटफॉर्मद्वारे 26 आध्यात्मिक स्थळांमध्ये 450 पेक्षा अधिक निवडक हॉटेल्स आणि होमस्टे, यात्रेकरूंसाठी उपलब्ध असणार आहे.

नॉलेजेबल एआय

n एलअँडटी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ) नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनीने (एनबीएफसी)  ‘नॉलेजेबल एआय’ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हर्च्युअल ऍडव्हायजर लॉन्च केला आहे. यामुळे गृहकर्जाचा अनुभव चांगला होईल.

महाराजाची नवी अगरबत्ती बाजारात

n महाराजा अगरबत्ती कंपनीने आपली नवी अगरबत्ती रॉयल ऊद आणि अनमोल प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. ही अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार करण्यात आली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. दैनंदिन जीवनात पवित्र कार्यासाठी वापरण्यात येणाऱया अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार करण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क – 8669185071.

रिलायन्स फाऊंडेशनची महाकुंभसाठी तीर्थ यात्री सेवा

n प्रयागराजमधील महाकुंभमेळय़ासाठी रिलायन्स फाऊंडेशनने तीर्थ यात्री सेवा नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या सेवेंतर्गत भाविकांना मोफत भोजन, मेडिकल सेवा, परिवहन सेवा, आरामासाठी विशेष कक्ष, कनेक्टिविटीसाठी विशेष प्रयत्न, पोलीस बुथ, येथील कर्मचाऱयांसाठी स्वच्छ पाण्याची सुविधा, जिओकडून 4 जी आणि 5 जी कनेक्टिविटी, सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. भाविकांना आरामात आणि सन्मानजनक आध्यात्मिक प्रवास मिळावा, हा यामागचा उद्देश आहे.

सीआयसी रेचा नफा

n पुनर्विमा कंपनी सीआयसी रेने संचालक मंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने आर्थिक वर्षात चांगली प्रगती नोंदवून 30,786.87 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या 28,458.11 कोटींच्या तुलनेत अधिक आहे.

एनजे वेल्थ गेमचेंजर

n सेबी परवानाधारक स्टॉकब्रोक म्हणून विश्वास देशपांडे यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली असून एनजे वेल्थ हे माझ्यासाठी गेमचेंजर ठरल्याचे त्यांनी सांगितले.  उत्साह, विश्वास आणि सातत्य हा यशस्वी होण्याचा साधा फॉर्म्युला आहे, असे विश्वास देशपांडे म्हणाले.

टाटा प्लेची सेल्सफोर्ससोबत भागीदारी

n सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने आज भारतातील आघाडीची डीटीएच व कंटेंट डिस्ट्रिब्युशन म्हणजेच डिजिटल कंटेंट पुरविणारी कंपनी असलेल्या टाटा प्लेसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून टाटा प्ले आपल्या ग्राहकांना अधिक उपयुक्त आणि वैयक्तिकृत अनुभव जलदगतीने देऊ शकणार आहे. या वेळी टाटा प्लेचे एमडी हरित नागपाल, सेल्सफोर्स इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या उपस्थित होत्या.

आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा

n आधार हाऊसिंग फायनान्सने आपला रिपोर्ट जाहीर केला असून यात कंपनीला डिसेंबर 2023 ते 2024 या वर्षभरात 21 टक्के नफा झाला आहे. कंपनीचा शुद्ध नफा (एयूएम) 21 टक्के वाढला असून तो 19,865 कोटी रुपयांवरून 23,976 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे आधार हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ऋषी आनंद यांनी सांगितले. वार्षिक आधारावर ही वाढ 21 टक्के झाली आहे, असे ते म्हणाले.

मुसळुणकर ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन

n विलेपार्ले येथील मुसळुणकर ज्वेलर्सच्या नव्या भव्य शोरूमचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या नव्या शोरुममध्ये खास लग्न सराईसाठी सोन्याच्या दागिन्यांचे अनेक प्रकार उपलब्ध असतील. रत्नागिरी जिह्यातील गुहागर तालुक्यातील तळवली या छोटय़ाशा गावातून मुंबईला नशीब आजमावायला आलेल्या वसंत महादेव मुसळुणकर यांनी 1949 साली व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून हे मराठी उद्योजक या व्यवसायात यशस्वी कामगिरी करत आहेत.