![bill-gates](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/03/bill-gates-696x447.jpg)
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत आहे. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढे ‘इंटेलिजंट’ होईल की, ते शाळकरी मुलांना शिकवेल. त्याच्याकडे आपल्या प्रत्येक गोष्टीवरचे उत्तर असेल. माणसाचे जीवन मशीनच्या अंमलाखाली असेल, असा गंभीर इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला. जिमी फॉलन यांच्या टॉक शोमध्ये बोलताना बिल गेट्स यांनी एआयवर चालणाऱ्या जगाला सावध केले. एआयमुळे भविष्यात आपले जीवन कसे असेल याबद्दल त्यांनी भाष्य केले. आपण ज्या युगाची सुरुवात करतोय, तिथे बुद्धिमत्ता दुर्मिळ असेल. एक महान डॉक्टर, एक महान शिक्षक येत्या दशकभरात अगदी मोफत आणि सामान्य असेल. एआयमुळे खूप बदल घडेल.
आठवडय़ाला पाच दिवस काम करण्याची गरज नाही. आठवडय़ाला दोन किंवा तीन दिवस काम करावे लागेल. असे असेल तर कुणाला आवडणार नाही, पण आपण याला आकार देऊ शकू का. लोक म्हणतात, हे थोडे भीतिदायक आहे. कारण हे पूर्ण नवे क्षेत्र आहे, अशी पुस्ती बिल गेट्स यांनी जोडली.
एआय तंत्रज्ञानाबद्दल बिल गेट्स यांचे विचार थोडे वेगळे आहेत. 2023 साली त्यांनी ओपन लेटरवर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये असा दावा केला होता की, आजाराची साथ किंवा आण्विक युद्धातून जेवढे नुकसान होईल, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान एआयमुळे होऊ शकते.