![Amarath Harris](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Amarath-Harris-696x447.jpg)
दहावीमध्ये सीए होण्याचे पाहिलेले स्वप्न तरुणीने अवघ्या 22 व्या वर्षी पूर्ण केले. अमरथ हारिस असे या तरुणीचे नाव आहे. ती दहावीच्या परीक्षेत केरळची टॉपर होती. त्याचवेळी तिने भविष्यात सीए होण्याचे स्वप्न पाहिले होते. अरमथने देशात पाचवी रँक मिळवली आहे. तिला 600 गुणांपैकी 484 गुण मिळाले आहेत. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ती केरळमधून टॉपर बनली आहे.