SSC-HSC Exam : परीक्षेत कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल होणार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परीक्षेत कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल होणार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कॉपी करताना कोणताही विद्यार्थ्या आढळ्यास त्यावर 1982 च्या काद्यानुसार त्यावर कारवाई केली जाणार आहे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या 11 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाने विशेष प्रयत्न केले असून त्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना शरद गोसावी यांनी सांगितलं की, ”परीक्षेत कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला करण्यात येईल. यामुळेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शांतपणे आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी.”