![global-morning](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/05/global-morning-696x447.jpg)
जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगची जगभरात चर्चा होत असते. जागतिक तापमानवाढीमुळे ग्लेशियर झपाट्याने वितळत असून त्यामुळे येत्या 50 वर्षात समुद्रकिनाऱ्याजवळील अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची भीतीही संशोधकांनी व्यक्त केली आहे. तसेच 2024 आणि 2025 हे जागतिक तापमानवाढीचे वर्ष असतील, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. त्यातच 2024 याची पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष अशी नोंद झाली आहे. आता 2025 नेही जागितक तापमावाढीचे वर्ष असल्याचे दाखवून दिले आहे. 1940 नंतर पहिल्यांदाच 2025 चा जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या ‘ला निना’चा प्रभाव आहे. ला निना मध्ये पर्यन्यमान सामान्य असते आणि जागतिक तापमानात घट होते, असे सांगण्यात येते. मात्र, हे तापमानवाढीचे वर्ष असल्याने ला निनाचा फारसा प्रभाव दिसत नाही. जानेवारी महिन्यात 1940 नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदविले गेले. या आधी 2024 हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे, तर जानेवारी 2025 मध्ये आतापर्यतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जागतिक सरासरी तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा 105 अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका अधिक गडद झाला आहे.
जानेवारीमध्ये पृथ्वीचे तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा 1.75 अंश सेल्सिअस जास्त होते. तर समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 20.78 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.
जानेवारी 2025 मध्ये सरासरी 13.23 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मागील वर्षाच्या तुलनेत ते 0.09 अंशांनी जास्त आहे. ‘ला निना’ मुळे मध्य प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील पाणी नेहमीपेक्षा थंड होते, ज्यामुळे जगभरातील तापमान कमी होते. ला निनाच्या प्रभावामुळे हिंदुस्थानात मुसळधार पाऊस पडतो. तर या उलट परिस्थिती ‘एल निनो’ मुळे दिसून येते. मात्र, यंदा ला निनाचा प्रभाव दिसत नसून हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.