![juliet rose](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/juliet-rose-696x447.jpg)
व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तिला गलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. या दिवशी गुलाबांना प्रचंड मागणी असते. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात महागडे गुलाब कोणते आहे? त्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
ज्युलिएट रोझ जगातील सगळ्यात महागडे गुलाब आहे. हे गुलाब दुर्मिळ असून फार मेहनतीने ते उगवले जाते. या गुलाबांची निर्मिती करणारे प्रसिद्ध फूल विक्रेता डेव्हिड ऑस्टिन यांनी अनेक गुलाब मिसळून ज्युलिएट रोजची निर्मिती केली. पोलन नेशनच्या अहवालानुसार, apricot-hued hybrid नावाची ही गुलाबाची दुर्मिळ प्रजात तयार करण्यासाठी 15 वर्षे लागली. 2006 मध्ये त्यांनी ते गुलाब 10 दशलक्ष पौंड म्हणजेच 90 कोटी रुपयांना विकले.
एवढे महागडे गुलाब घेताना मोठमोठ्या श्रीमंतांनाही 20 वेळा विचार करावा लागेेल. सध्या या गुलाबाची किंमत 5.8 अमेरिकी डॉलर आहे. हिंदुस्थानच्या करन्सीनुसार ही किंमत 1,38,33,68,063 एवढी आहे. या गुलाबाच्या सुंगंधाबबत बोलायचे झाले तर हलक्या चहासारखा सुगंध येतो. या गुलाबाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गुलाब तीन वर्षांपर्यंत कोमेजत नाही. याचबरोबर कुडूपाल फ्लॉवर नावाच्या गुलाबाची गणनाही जगातील महागड्या फुलांमध्ये केली जाते. त्याला भूतिया फूल या नावानेही ओळखले जाते. विशेष म्हणजे कुडूपालचे फूल फक्त रात्रीच फुलते. ते फक्त श्रीलंकेत आढळते.