Supreme Court – मृतदेहासोबत सेक्स करणे म्हणजे बलात्कार नाही, सुप्रीम कोर्टाचे मत

मृत व्यक्तीवर बलात्कार किंवा अनैसर्गिक कृत्य करण्याला अर्थात नेक्रोफिलीया याला सध्याचे कायदे गुन्हा म्हणून मान्यता देत​​नाहीत. त्यामुळेच नेक्रोफिलिया हा गुन्हा म्हणून ओळखला जात नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे

बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीची कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्या निर्णयाला आव्हान देत कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. यावेळी खंडपीठाने नेक्रोफिलीया अर्थात मृत व्यक्तीवर बलात्कार करण्याच्या कृत्यावर भाष्य केले.

भारतीय दंड संहिता नेक्रोफिलीया हा गुन्हा मानत नाही. संसदेने या समस्येवर विचार करणे आणि कायदा करणे आवश्यक आहे. सध्याच्या दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा म्हणून मान्यता नसलेल्या कृत्यासाठी न्यायालय एखाद्याला शिक्षा देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नमूद केले आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.