![santosh bangar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/santosh-bangar-696x447.jpg)
मुंबईतील मंत्रालयाच्या मागच्या बाजुला असलेल्या आकाशवाणी आमदार निवासात शुक्रवारी सकाळी आगीची घटना घडली. मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या खोली क्रमांक 313 मध्ये ही आग लागली होती. खोलीतील एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही आग लागली. खोली क्रमांक 313 मध्ये ही आग लागली. ही खोली मिंधे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांची आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणतीती जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याचे कळताच सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले.