राहुल सोलापूरकरच्या विरोधात सांगवीत शिवसेनेचे आंदोलन

अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखतीत बोलताना केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सांगवी विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडो मारून तिचे दहन केले.

शिवदूत मोहन बारटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राजाभाऊ तुपे, सिकंदर पोंगडे, ज्येष्ठ शिवसैनिक सतीश गरड, शाखाप्रमुख राजू बेट, उपविभाग प्रमुख भानुदास साळुंखे, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक ढोरे पाटील, संघटक चिंचवड विधानसभा श्रीविष्णू धोत्रे, ज्येष्ठ शिवसैनिक सचिन कांबळे, शाखाप्रमुख राजाभाऊ खाडे, शाखाप्रमुख बाळासाहेब पिल्लेवार, मगन सावंत, नाना भेंडे, वसंत जाधव, अमेय बारटक्के, युवासेना सचिव राजू लोंडके, शिवाजी चव्हाण, वैभव जाधव, प्रभाकर बालुरे, ओंकार वळसे, लक्ष्मण मजकुरे, नागेश बिरादार, अमीर हसन, सुनील मुळखेडे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल राहुल सोलापूरकरने इतिहासाची मोडतोड करून चुकीचे वक्तव्य केले आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.