निवडणूक आयोग मेलाय फक्त घोषणा व्हायचीय! अखिलेश यांचा प्रहार

निवडणुकांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणारा केंद्रीय निवडणूक आयोग मेला आहे. त्याची फक्त घोषणा बाकी आहे. आयोगाला आम्ही मढय़ावर पांघरण्याचे पांढरे कापड भेट म्हणून देणार आहोत, अशी जहरी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.

अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी पोलिसांच्या मदतीने गैरप्रकार झाले आहेत. मतदानादरम्यान पोलीस अधिकार नसताना मतदारांचे ओळखपत्र तपासत होते. याची दखल आयोगाने घ्यायला हवी होती. मात्र या गैरप्रकारांकडे आयोगाकडून हेतूपुरस्सर काणाडोळा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस मतदारांचे ओळखपत्र तपासत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी मतदारांच्या मनात भय निर्माण करून त्यांच्यावर दबाव आणणाऱया या पोलीस अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली होती. याशिवाय भाजपचे समर्थक पोलीस संरक्षणात अनेक ठिकाणी प्रक्षोभ निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली. ही भाजपची निवडणूक लढवण्याची पद्धत असून निवडणूक आयोगाचा तर मृत्यू झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.