भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्तपदावरून सोलापूरकर पायउतार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत  अवमानकारक वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरने भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे, असे संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.

सोलापूरकरच्या विरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज आले आहेत. त्यावर कायदेशीर पडताळणी करून कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. सोलापूरकरने एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. याबाबत अनेक संस्था संघटनांनी निदर्शने केली. शिवसेना पक्षाने सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.