अमेरिकेचे घूमजाव; पॅलेस्टिनींना तात्पुरते विस्थापित करणार, व्हाईट हाऊसमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

ट्रम्प यांना गाझापट्टी ताब्यात घ्यायची नसून तेथील जागेच्या पुर्नविकासासाठी तेथील 18 कोटी पॅलेस्टिनींना तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित किंवा विस्थापित करायची त्यांची भूमिका असल्याचे ट्रम्प सरकारमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले. ट्रम्प यांनी भूमिका घेतल्यानंतर मध्य पूर्वेतील देश आणि अमेरिकेचे सहकारी देश यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर अमेरिकेने आज घूमजाव केले. अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. राज्य सचिव मार्को रुबीयो आणि व्हाईट हाऊस प्रेस सचिव पॅरोलिन लीव्हीज यांनी ट्रम्प यांची पॅलेस्टिनींनाना बाहेर काढण्याच भूमिका नसल्याचे सांगितले.