मार्कस स्टॉयनिसची वन डेतून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कारकीर्दीच्या ‘पुढील अध्यायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी’ ही निवृत्ती जाहीर करत असल्याचे मार्कसने सांगितले. ऐन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर मार्कसने जाहीर केलेली निवृत्ती ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धक्का असून डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे, मात्र मार्कस हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाकडे त्यांचा अंतिम संघ जाहीर करण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे स्टॉयनिसच्या जागी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत असलेल्या ‘एसएटी-20’ स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे स्टॉयनिसने अचानक निवृत्ती घेतली असावा, असा अंदाज आहे. स्टॉयनिसने 71 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1495 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि सहा अर्धशतकी खेळींचा समावेश आहे, तर 48 विकेटही त्याने टिपले आहेत. असे ही स्टॉइनिस म्हणाला. स्टॉइनिसने 71 एकदिकसीय सामन्यांमध्ये 1 हजार 495 धाका केल्या असून, त्यात 1 शतक आणि 6 अर्धशतकी खेळींचा समाकेश आहे.