उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना ‘मोक्का’ लावा

उद्योजकांना त्रास देणाऱयांवर ‘मोक्का’सारखी कारवाई करा. त्याखालची कारवाई करू नका, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले. जगभरातील कंपन्यांशी आपण करार करतोय. आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणे आवश्यक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल, देहूरोड येथील पोलीस विश्रामगृहासह पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत असल्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष व्यवस्था म्हणून पिंपरी-चिंचवडसाठी नवीन पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली