शिवसेनेच्या नव्या संसदीय कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन

शिवसेनेच्या नव्या संसदीय कार्यालयाचे उद्घाटन आज मोठय़ा दिमाखात झाले. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून संसदेच्या तिसऱया मजल्यावरील दालन क्रमांक 128 मधील कार्यालयाचा औपचारिक शुभारंभ झाला. या वेळी श्रीगणेशाची पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, भाऊसाहेब वाप्चौरे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय दीना पाटील, ओमराजे निंबाळकर, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.