Photo: महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी पुण्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केलं. यातच पुण्याीतल चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी ए.के. 47 चा अनुभव घेतला. ए.के. 47 हाती घेत यावेळी अजित पवार पत्रकरांशी संवाद साधताना म्हणाले की, ”महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू.”, ते असं म्हणताच एकाच कार्यक्रमात हशा पिकाला.