नियम! 33 फूट दूर राहून सिगारेट ओढा

smoking-bad-habbit

इटलीमध्ये धूम्रपानविरोधी कडक नियम लागू करण्यात आला आहे. मिलान शहरात सिगारेट ओढायची असेल तर दुसऱ्या व्यक्तीपासून 33 फूट दूर अंतर ठेवावे लागेल. इटलीमध्ये धूम्रपानविरोधी कायदे करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढायला बंदी आहे. अशातच मिलान शहरासाठी 1 जानेवारीपासून काही नवे नियम बनवण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्याबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत.