![sanny leony](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/sanny-leony--696x447.jpg)
सनी लियोनीने 8 कोटींचे ऑफिस केले खरेदी बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी हिने मुंबईतील ओशिवरा भागात 8 कोटी रुपयांचे ऑफिस खरेदी केलेय. प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सनुसार, हे ऑफिस स्पेस करनजीत कौर वेबर या नावाने खरेदी केलेय. सनी लियोनीचे खरे नाव करनजीत कौर असे आहे. ऑफिस स्पेसचे कारपेट एरिया 176.98 वर्ग मीटर आहे. तर बिल्ट अप एरिया 194.67 वर्ग मीटर आहे. यात तीन कार पार्किंग देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी 35.01 लाख रुपयांची स्टँम्प ड्युटी आणि 30 हजार रुपयांची नोंदणी फी मोजली आहे. सनी लियोनीने ही प्रॉपर्टी आनंद कमलनयन पंडित आणि रुपा पंडित यांच्या मालकीची कंपनी ऐश्वर्या प्रॉपर्टी अँड इस्टेट्सकडून खरेदी केली आहे. आनंद पंडित हे चित्रपट निर्माता, वितरक आणि रियल इस्टेट डेव्हलपर्स आहेत.