इतिहासाची मोडतोड आणि काँग्रेस बदनामी योजना म्हणजेच पंतप्रधान मोदींचे भाषण; काँग्रेसचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्य सभेत सुमारे 90 मिनिटांचे भाषण केले. पंतप्रधान मोदी यांचे राज्यसभेतील भाषण म्हणजे त्यांच्या प्रचारसभेतील भाषणासारखेच होते. संसदेच भाषण करण्याचा दर्जा त्यांनी राखला नाही. इतिहासाची मोडतोड आणि काँग्रेसची बननामी यासाठीच त्यांनी हे भाषण केले. त्यांचे भाषण हे निवडणुकीचे भाषण होते, अशा शब्दांत काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर टीका केली आहे. संसदेत पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात रेटून खोटे बोलत काँग्रेसची बदनमी केली, असे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

जयराम रमेश म्हणाले की, 90 मिनिटांचे पंतप्रधानांचे भाषण म्हणजे पंतप्रधान इतिहासाची मोडतोड योजना आणि पंतप्रधान काँग्रेस बदनाम योजना हेच होते. याव्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीही नव्हते. इतिसाहासाची मोडतोड करत त्यांनी तो संसदेत मांडला. काँग्रेसची बदनामी केली. त्याचे भाषण म्हणजे निवडणूक प्रचारच होता. प्रचारसभेत ते बोलतात, त्याप्रमाणेच ते संसदेत बोलत होते. संसदेत पंतप्रधान भाषण करतात, त्याला एक दर्जा, मान सन्मान, प्रतिष्ठा असते. मात्र, पंतप्रधानांच्या भाषणात ती दिसली नाही. पंतप्रधानांच्या 90 मिनिटांच्या भाषणात खोटेपणाची गंगा वाहत होती, असा हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला.