![ornaments](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ornaments-696x447.jpg)
लिपस्टिक आणि कानातली बाळी खरेदी करण्यासाठी एका चिमुरडीने आपल्या आईचे तब्बल 1.16 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अवघ्या 680 रुपयांत विकले. ही घटना चीनच्या शांघाय येथे घडली आहे. मुलीच्या आईने पोलिस स्टेशनला धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मुलीला वाटले हे सोन्याचे खरे दागिने नसून बनावट दागिने आहेत. त्यामुळे तिने ते विकल्याचे मान्य केले. या छोट्या मुलीला लिप स्टड 30 युआन म्हणजेच 340 रुपय आणि एक इयरिंग 30 युआनचे होते. हे खरेदी करण्यासाठी तिने घरातील सोन्याचे दागिने विकले. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पालकांना दोषी ठरवले आहे. छोट्या मुलीपर्यंत सोन्याचे दागिने कसे काय पोहोचले. जर कुटुंबाकडे सव्वा कोटींचे दागिने होते. तर मुलीला 680 रुपये का देत नव्हते, असेही अनेकांनी म्हटले आहे.