तुम्ही पण WhatsApp वापरत असाल तर, ही बातमी नीट वाचा. WhatsApp च्या म्हणण्यानुसार, मेटा कंपनीने अलीकडेच इस्त्रायली स्पायवेअर फर्म Paragon सोल्युशनवर काही पत्रकार आणि इतरांना हॅक केल्याचा आरोप केला आहे. यावर अधिक भाष्य करताना WhatsApp ने म्हटलं की, Paragon कंपनीचे स्पायवेअर लोकांना टार्गेट करत आहे.
या व्हायरसमुळे तुमच्या खासगी माहितीला धोका पोहोचु शकतो आणि तुम्हाला टार्गेटही केले जाऊ शकते. जगभरामध्ये WhatsApp चे करोडो वापरकर्ते असल्यामुळे मेटा कायमच व्हायरसच्या बाबतीत सतर्क असते. त्यामुळे आता WhatsApp वापरकर्त्यांनीही सतर्क राहणं खूप गरजेचे झालेले आहे.
ग्राफीटी व्हायरस काहीही क्लिक न करता आपल्या मोबाईलमध्ये प्रवेश करु शकतो. यालाच झीरो Attack असे म्हटले जाते. यामाध्यमातून हॅकर्स खासगी माहिती तसेच इतर अनेक महत्त्वाची माहिती हॅक करु शकतो. या एकूणच घडामोडीवर लक्ष दिले असता, Whatsapp आता कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. त्यांनी यासंदर्भात नुकतीच पॅरागाॅन कंपनीला नोटीसही पाठवली आहे.
Whatsapp हे कायम त्यांच्या वापरकर्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कटीबद्ध असते. त्यामुळेच आता त्यांनी Whatsapp ची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.