USA मधील फिल्म फेस्टिव्हलमध्ये संस्कृतीने दाखवलं ‘करेज’! अभिनेत्रीने पहिल्यांदाच केलं हिंदुस्थानचं प्रतिनिधीत्व

सॅंटो डेम्निगो यूएसए फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रतिनिधीत्व करणारी हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडे ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये झालेल्या सॅंटो डेम्निगो फिल्म फेस्टिव्हलमध्ये संस्कृतीचा पहिला इंग्रजी चित्रपट ‘करेज’ चं स्क्रिनिंग पार पडलं. विशेष म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये संस्कृतीने हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व केलं. हा फेस्टिव्हल संस्कृतीसाठी अगदी खास ठरला. या प्रसंगाचा अनुभव संस्कृतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये संस्कृतीने सांगितले की, तुम्ही माझ्या करेज या चित्रपटाला खूप प्रेम दिलं, यासाठी मी कायम तुमची आभारी राहीन. हे सर्व अनअपेक्षित आहे आणि याचा मला आनंद देखील आहे. तुम्हाला आमची कलाकृती आवडली आणि तुम्ही ती आपलीशी केली. आपले आभार मानावे तितके कमी आहे. मात्र, हा समृद्ध संपन्न करणारा अनुभव कमालीचा होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@sanskruti_balgude_official)

संस्कृतीने आजपर्यंत तीच्या अभिनयाने अनेक मराठी चित्रपट गाजवले. तसेच तीच्या या इंग्रजी चित्रपटाला देखील प्रंक्षकांनी भरभरुन प्रेम केले. जगभरात या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.