क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून शोक व्यक्त

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली वाहिली.