बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. जमावाने बुधवारी बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड करून आग लावली. रहमान यांच्या कन्या आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या ढाका येथील लाईव्ह ऑनलाइन भाषणादरम्यान ही घटना घडली.
स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री 9 वाजता हसीनाचे भाषण होणार असल्याने सोशल मीडियावर “बुलडोझर मिरवणूक” काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. अवामी लीगच्या बरखास्त झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या छात्र लीगने हसीना यांचे भाषण आयोजित केले होते. आपल्या भाषणात, माजी पंतप्रधानांनी देशवासीयांना सध्याच्या राजवटीविरुद्ध संघटित प्रतिकार करण्याचे आवाहन केले.
तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी हसीना यांनी नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या सरकारकडे इशारा केला आहे. त्यांच्याकडे अजूनही राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि स्वातंत्र्य बुलडोझरने उद्ध्वस्त करण्याची ताकद नाही, असे हसीना म्हणाल्या. तसेच ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास नाही. पण त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास बदला घेतो, असे हसीना यांनी पुढे नमूद केले.