![tirupati-temple](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/09/Tirupati-temple-696x447.jpg)
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने 18 कर्मचाऱयांना गैरहिंदू परंपरांचे पालन केल्याचा ठपका ठेवत कामावरून काढून टाकले. तिरुमला तिरुपती देवस्थानने नियमांविरुद्ध काम केल्याबद्दल या सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे. या कर्मचाऱयांनी एकतर दुसऱया सरकारी विभागात बदली घ्यावी किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, अशा दोन अटी ठेवल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. संस्थेत काम करताना बिगर हिंदू धार्मिक प्रथा पाळणाऱया 18 कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. टीटीडीमध्ये काम करूनही ते सर्व जण गैरहिंदू धार्मिक परंपरांचे पालन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे टीटीडीने निवेदनात म्हटले आहे.