![pm modi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/pm-modi-696x447.jpg)
मोदी है तो मुमकीन है… मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान पाच ट्रिलियनचा आकडा गाठेल, अशा नुसत्या गप्पा मारणे सुरू आहे. परंतु, देशाची खरी परिस्थिती किती वाईट झाली आहे, याची माहिती समोर आली आहे. फोर्ब्सने नुकतीच 2025 साठी जगातील टॉप 10 शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली असून या यादीत हिंदुस्थानला स्थान मिळालेले नाही. यात सर्वात धक्कादायक म्हणजे हिंदुस्थान जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे तसेच देशाचे लष्करसुद्धा मोठे आहे. तरीसुद्धा फोर्ब्सच्या यादीत हिंदुस्थानला स्थान मिळालेले नाही. फोर्ब्सच्या माहितीनुसार, ही यादी यूएस न्यूजने तयार केली आहे. यात पाच प्रमुख मुद्दय़ांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात देशातील नेता, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, आंतरराष्ट्रीय आघाडी आणि लष्कराची पॉवर याचा समावेश आहे. हिंदुस्थानचा या यादीत समावेश न करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जगातील टॉप शक्तिशाली देश
- अमेरिका – 30.34 ट्रिलियन डॉलर
- चीन – 19.53 ट्रिलियन डॉलर
- रशिया – 2.2 ट्रिलियन डॉलर
- ब्रिटन – 3.73 ट्रिलियन डॉलर
- जर्मनी – 4.92 ट्रिलियन डॉलर
- दक्षिण कोरिया – 1.95 ट्रिलियन डॉलर
- फ्रान्स – 3.28 ट्रिलियन डॉलर
- जपान – 4.39 ट्रिलियन डॉलर
- सौदी अरब – 1.14 ट्रिलियन डॉलर
- इस्रायल – 550.91 बिलियन डॉलर