देशातील नागरिकांच्या खिशावर लवकरच आणखी एक भार पडण्याची शक्यता आहे. एटीएममधून कॅश काढणाऱ्या ग्राहकांना आता अतिरिक्त व्यवहारावर जादा पैसे भरावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक ग्राहकांसाठी शुल्क आणि एटीएम इंटरचेंज फी अधिक वाढवणार आहे. सध्या केवळ पाच व्यवहार मोफत मिळत आहेत. पाचपेक्षा जास्त व्यवहारांवर पैसे मोजावे लागतात. कॅश ट्रान्झॅक्शनसाठी इंटरचेंज फी 17 रुपयांवरून 19 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी हे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपये करण्यात आले आहे. आरबीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.