अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर टॅरिफ लावण्याचा घेतलेल्या निर्णयाचा फटका क्रिप्टो मार्पेटला बसला आहे. क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये बुधवारी जवळपास एक टक्का घसरण झाली. बिटकॉईन घसरून आता 97,760 डॉलरवर आले, तर इथरच्या किमतीसुद्धा 2,761 डॉलरवर ट्रेड करत आहेत. कार्डानो, तेथर, पोका डॉट, चेनलिंक किमतीतसुद्धा घसरण झाली आहे. अवघ्या एका दिवसात क्रिप्टो मार्पेट पॅपिटलायझेशन जवळपास 2.60 टक्के कमी होऊन 3.23 लाख कोटी डॉलरवर पोहोचले.
शांतनू नायडूंवर टाटा मोटर्सची जबाबदारी
उद्योगपती रतन टाटा यांच्या अखेरच्या काळात सतत सोबत असणारे शांतनू नायडू यांच्यावर टाटा मोटर्सनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. टाटा मोटर्समध्ये महाप्रबंधक प्रमुख बनवण्यात आल्याची माहिती शांतनू यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे. नायडू यांनी टाटा नॅनोसोबत एक पह्टो शेअर केला आहे. माझे वडील पांढरा शर्ट घालून टाटा मोटर्स प्लांटमध्ये जायचे. मी खिडकीत बसून त्यांची वाट पाहायचो. आता हे वर्तुळ पूर्ण झालेय, असे शांतनू यांनी म्हटले आहे. रतन टाटा आणि शांतनू यांच्यातील नाते अतूट असे झाले होते.
अधिकाऱ्याकडे सापडले दीड कोटी
ओडिशा सरकारमध्ये एका उच्चपदावर अधिकारी असलेल्या शांतनू महापात्र यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरात तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. मलकानगिरी, कटक, भुवनेश्वरसह एकूण सात ठिकाणी छापेमारी केली. भ्रष्टाचारविरोधी पथकाने छापा टाकल्यानंतर त्यांच्या हाती मोठे घबाड सापडले. या छापेमारीवेळी दोन सहायक पोलीस अधीक्षक, चार पोलीस उप-अधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उप निरीक्षक यांच्यासह टीम उपस्थित होती.
जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन
जगातील सर्वाधिक वृद्ध महिलेचे निधन झाले. लिन शेमू असे या महिलेचे नाव असून त्या 122 वर्षे आणि 197 दिवसांच्या होत्या. लीन यांचा जन्म 18 जून 1902 साली झाला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात दोन जागतिक युद्धे, दोन महामारी यासह अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहिल्या आहेत. लीन यांना 3 मुले, मुली आहेत. त्यांच्या सर्वात छोटय़ा मुलाचे वय 77 वर्षे आहे.
स्पेनमध्ये कामाचे तास कमी करण्याचा प्रस्ताव
हिंदुस्थानात आठवडय़ात किमान 70 ते 90 तास काम करावे यावर चर्चा सुरू असताना स्पेनमध्ये मात्र आठवडय़ाच्या कामाचे तास कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, आठवडय़ाला कामाचे तास 40 वरून 37.5 तासांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता हा प्रस्ताव संसदेत सादर केला जाईल.
अमेरिकेत चोरांनी 35 लाखांची अंडी चोरली
अमेरिकेत सध्या अंडय़ांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अंडय़ांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे, परंतु अमेरिकेतील ग्रीन पॅसलमध्ये चोरटय़ांनी 40 हजार डॉलरच्या किमतीची म्हणजेच जवळपास 35 लाख रुपयांची अंडी चोरली आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अंडय़ांची चोरी झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.