विधवा महिलांशी लग्न करून लाखो रुपयांना लावला चुना, 51 वर्षाचा नवरा फरार

मुंबईत एका 51 वर्षाच्या व्यक्तीने विधवा महिलांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. या व्यक्तीने विधवा महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी लग्न केले आणि काही दिवसानंतरच सर्व दागिने घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

मुंबईतल्या दिंडोशीमध्ये एका विधवा महिलेची मॅट्रिमोनियल साईटवर एका 51 वर्षीय व्यक्तीची ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी लगन्ही केले. पण लग्नाच्या काही दिवसानंतरच ही व्यक्ती त्या महिलेचे सर्व दागिने घेऊन फरार झाला. आरोपीने आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. या दोघांनी लग्न केल्यानंतर या व्यक्तीने महिलेचे 17 लाख रुपयांपेक्षा किंमतीचे दागिने घेऊन फरार झाला.

ही व्यक्ती जिथे काम करत होती, तिथे या महिलेने धाव घेतली. तिथे जाऊन कळालं की या व्यक्तीने कंपनीतही आर्थिक घोटाळा केला होता. तसेच या व्यक्तीचा शोध घ्यायला काही महिला आल्या होत्या असेही कंपनीच्या लोकांनी सांगितले.