![Ola Roadster X](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Ola-Roadster-X-696x447.jpg)
दुचाकी उत्पादक कंपनी Ola ने हिंदुस्थानात आपली इलेक्ट्रिक बाईक Ola Roadster X लॉन्च केली आहे. याआधी ओलाकडून फक्त इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होत्या. पण आता कंपनीने पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ओलाने 15 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदा या बाईकचे अनावरण केले होते. ही बाईक रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स+ या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक हिंदुस्थानात Ultraviolette F77 SuperStreet इलेक्ट्रिक बाईकशी स्पर्धा करेल.
फीचर्स आणि रेंज
Ola Roadster X बाईक स्पोर्टी डिझाइनमध्ये आहे. ही सिंगल-पीस सीट, सिंगल-पीस ग्रॅब्रेल, अलॉय व्हील्स, फ्रंट डिस्क ब्रेक, सिंगल-चॅनल एबीएस, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, ब्रेक-बाय-वायर आणि इंडस्ट्री फस्ट फ्लॅट केबल इम्प्लिमेंटेशन या सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय, यात चेन ड्राइव्हसह अधिक पावरफुल मिड-माउंट मोटर आहे. बाईकचे दोन्ही सस्पेंशन मजबूत असल्याचं सांगितलं जात आहे, जे खराब रस्त्यांवर आरामदायी राइड देईल.
बॅटरी पॅक आणि रेंज
ओला रोडस्टर या बाईकची रेंज 117km ते 200km आहे. बाईकची टॉप स्पीड 105kmph पासून 105kmph पर्यंत जातो. तर Ola Roadster X+ मध्ये 4.5kWh पर्यंतचा मोठा बॅटरी पॅक आहे. या प्रकाराची रेंज 252km ते 501km आहे, असं बोललं जात आहे. बाईकची टॉप स्पीड 125kmph आहे. ओला रोडस्टर X+ ही देशातील पहिली बाईक आहे जिची एवढी मोठी रेंज आहे.
किती आहे किंमत?
या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याच्या 2.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 74 हजार 999 रुपये, 3.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 84 हजार 999 रुपये आणि 4.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 94 हजार 999 रुपये आहे.
Ultraviolette F77 SuperStreet इलेक्ट्रिक बाईक
दरम्यान, Ola Roadster X बाईक हिंदुस्थानात Ultraviolette F77 SuperStreet शी स्पर्धा करेल. F77 SuperStreet ही बाईक कंपनीने 31 जानेवारी रोजी देशात लॉन्च केली. ज्याची बुकिंगही सुरू झाली आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 सुपरस्ट्रीट F77 सोबत मोटर आणि बॅटरी पॅक शेअर करते. याच्या स्टँडर्ड प्रकारात 7.1 kWh ची बॅटरी क्षमता आहे. ज्याची रेंज 211 किमी आहे, असा दावा करण्यात येत आहे. याची एक्स-शोरूम किंमत 2,99,000 रुपये आहे.